न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ३१ जुलै २०२१) :- ” पे अँड पार्किंग ” धोरण विरोधात अपना वतन संघटनेच्या वतीने शनिवारी (दि. ३१) विरोधी पक्षनेते राजू मिसाळ यांच्या आकुर्डीतील जनसंपर्क कार्यालयावर आंदोलन करीत पे अँड पार्किंग च्या प्रस्तावाची होळी करून निषेध व्यक्त केला.
या आंदोलनात अपना वतन संघटनेचे अध्यक्ष सिद्दीकभाई शेख, कार्यध्यक्ष हमीद शेख, महिला अध्यक्ष राजश्री शिरवळकर, सामाजिक कार्यकर्ते दीपक खैरनार, संघटक निर्मला डांगे, नॅशनल ब्लॅक पँथरच्या संगीत शहा, तौफिक पठाण, छावा मराठा युवा महासंघचे धनाजी येळकर पाटील, संभाजी ब्रिगेडचे सतीश काळे, सालार शेख इमाम नदाफ, सुधीर वाळके, संकल्प फाउंडेशनचे गणेश जगताप, केशव बुडगल, लक्ष्मण पांचाळ यांसह अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.
विरोधी पक्षनेते राजू मिसाळ यांनी आंदोलनाला पाठिंबा दिला असून सर्वसाधारण सभेत राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने विरोध करणार असल्याचे सांगितले. आंदोलकांनी पे अँड पार्कींग चा प्रस्ताव जाळून, पे अँड पार्किंग रद्द करा, पे अँड पार्किंग च्या माध्यमातून होणारी पिळवणूक थांबवा, अशा घोषणांनी परिसर दणाणून सोडला.












