- चिखली हरगुडे वस्तीतील घटना…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०५ ऑगस्ट २०२१) :- पतीसोबत मतभेद असल्यामुळे पत्नी एकटीच रहात होती. तीचा गळा आवळून अत्यंत निर्घुणपणे खून करण्यात आला. ही घटना गुरुवारी (दि. ५) सकाळी उघडकीस आली. कमल बाबूराव खाणेकर (वय ५५, रा. हरगुडेवस्ती, चिखली) असे खून झालेल्या महिलेचे नाव आहे.
पोलिसांनी त्यांना रुग्णालयात दाखल केले मात्र त्यांचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी जाहीर केले. शवविच्छेदन अहवालात त्यांचा गळा आवळून खून झाल्याचे निष्पन्न स्पष्ट झाले आहे. त्यांचा खून कोणी आणि कशासाठी केला आहे, याचा चिखली पोलीस तपास करीत आहेत.
त्यांच्या शेजारी राहणाऱ्या व्यक्तीने सकाळी साडेअकराच्या सुमारास त्यांना घराबाहेरून आवाज दिला. मात्र, त्यांनी काहीच प्रतिसाद न दिल्याने उघड्या दरवाजावाटे शेजारी राहणाऱ्या व्यक्तीने घरात प्रवेश केला. त्यावेळी त्यांचे हातपाय बांधलेले आणि तोंडाला चिकटपट्टी लावलेली आढळून आली. त्यांनी या घटनेची माहिती त्वरीत चिखली पोलिसांना दिली.












