- एसएमएसद्वारे जाब विचारून केले हैराण; दोन हजार नागरिकांचा सहभाग…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०६ ऑगस्ट २०२१) :- निगडीतील यमुनानगर भागात वीजपुरवठा दिवसातून किमान दोन तास बंद असतो. याबाबत विचारना केली असता महावितरण अधिकारी उडवाउडवीची उत्तरे देतात. त्या पार्श्वभूमीवर नगरसेवक उत्तम केंदळे यांनी थेट अधिकाऱ्यांना एसएमएस पाठवून जाब विचारा, असे नागरिकांना आवाहन केले. त्यास प्रतिसाद देत अधिकाऱ्यांना हजारो प्रश्नांचे एसएमएस पाठविण्यात आले आहेत.
कोरोना, लॉकडाऊन काळात अनेकांना भरमसाठ वीज बिले आली आहेत. याबाबत ग्राहकांतून तीव्र नाराजी व्यक्त होतेय. वीज बिले माफ करण्यासाठी अनेकदा आंदोलने केली. मात्र, कोणाचीच वीज बिले रद्द केलेली नाहीत.
त्यातच यमुनानगर भागातील वीज पुरवठा दिवसातून दोन वेळा बंद असतो. केंदळे यांनी नागरिकांना एसएमएसद्वारे जाब विचारण्यासाठी आवाहन केले. या आवाहनाला यमुनानगर भागातील सुमारे दोन हजार नागरिकांनी प्रतिसाद दिला.
सततच्या वीज बंदमुळे नागरिक हैराण झाले आहेत. समस्यांचे एसएमएस महावितरण अधिका-याला करा, असे अवाहन केले होते. यमुनानगरमधील हजारो नागरिकांनी एसएमएस करुन महावितरण अधिका-याला जाब विचारला. महावितरणला ‘ एसएमएसद्वारे विजेचा शॉक दिला’.
– उत्तम केंदळे, नगरसेवक, पिं. चिं. मनपा…












