- वाकड पोलीस चौकीत गुन्हा दाखल…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १४ ऑगस्ट २०२१) :- विवाहितेला तिच्या रंगावरून माहेरच्यांनी वारंवार त्रासदायक शब्द वापरले. घराच्या हक्कसोड पत्रावर सही व घटस्फोट घेण्यास जबरदस्ती केली. तिला आत्महत्येस प्रवृत्त केल्याची वाकड पोलीस चौकीत विवाहित महिलेच्या आईने फिर्याद दिली आहे.
ही घटना सन २०११ ते ७ जुलै २०२१ दरम्यान पुनावळेत घडली. संदीप कांतीलाल पाटील (वय ४०), कांतीलाल झावरु पाटील (वय ५६, रा. पुनावळे) व इतर दोन महिलांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. वाकड पोलीस अधिक तपास करत आहेत.