- चिंचवड पोलिसात फिर्याद दाखल…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १४ ऑगस्ट २०२१) :- चिंचवडेनगर येथे पत्नीने अज्ञात कारणावरून झालेल्या भांडणातून एकाला ढकलून दिले तर, पतीने त्याच्या डोक्यात दगड घालून जीवे मारण्याचा प्रयत्न केला. शुक्रवारी (दि. १३) दुपारी दोनच्या दरम्यान ही घटना घडली.
संतोष उर्फ पप्पू प्रभाकर लोंढे (वय २९) असे या जखमी तरुणाचे नाव असून त्यांच्या बहिणीने चिंचवड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यावरून संजय जाधव व त्याची पत्नी (रा. चिंचवडचे नगर, चिंचवड) या दोघांच्या विरोधात खूनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. चिंचवड पोलीस अधिक तपास करत आहेत.
















