- शिवसेना गटनेत्यांची सत्तारूढ पक्षनेत्यांच्या त्या मागणीवर मिश्कील टिपण्णी…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २७ ऑगस्ट २०२१) :- भाजपचे पक्षनेते नामदेव ढाके हे कोणत्याही प्रकारची प्रतिक्रिया चिंचवडला विचारल्याशिवाय देत नाहीत. ही प्रतिक्रिया चिंचवडला विचारुनच दिली असेल की, ‘भाऊ मी नार्को तुमच्यापासूनच सुरु करू का?’ अशी तिखट प्रतिक्रिया सत्तारुढ पक्षनेते नामदेव ढाके यांच्या त्या मागणीवर शिवसेना गटनेते राहुल कलाटे यांनी दिली आहे.
“सत्तारुढ पक्षनेते नामदेव ढाके यांचे दोनही नेते, शहराचा गाडा हाकणारे चिंचवडचे आमदार लक्ष्मणराव जगताप आणि भोसरीचे आमदार महेश लांडगे हे दोघेही स्थायी समितीचे अध्यक्ष होते, असेही ते म्हणाले आहेत.
भाजपने स्थायी समितीमध्ये उतरत्या दराने विकासकामे केल्यामुळे मोठ्या प्रमाणात निधीची बचत झाली. याउलट राष्ट्रवादीच्या काळातील निविदा चढ्यादराने करून पालिकेची लुट केली आहे. याचा हिशोब राष्ट्रवादीने द्यावा. स्थायी समिती सभापतींवरील कारवाईचे राजकीय षडयंत्र आहे. चौकशीच करायची असेल तर महापालिकेच्या स्थापनेपासून आत्तापर्यंतच्या सर्वच सभापतींची नार्को टेस्ट करावी. त्यात खरं काय ते जगासमोर नक्कीच येईल, अशी मागणी सत्तारुढ पक्षनेते नामदेव ढाके यांनी केली होती.












