- रस्त्यावर झोपलेल्या चिमुकलीवर रिक्षाचालकाचा अत्याचार…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०९ सप्टेंबर २०२१) :- पुणे स्टेशन येथील एसटी स्थानकाजवळील फुटपाथावर आईच्या बाजूला सहा वर्षाची मुलगी झोपली होती. रिक्षाचालकाने त्या मुलीला उचलून, रिक्षात बसविले व पुढे निघून गेला.
तेथील एका रिक्षा चालकांने हा प्रकार पहिला, त्यांनी पोलिसांना माहिती दिली व त्या रिक्षाचालकाचा पाठलाग केला. मात्र अंधाराचा फायदा घेऊन रिक्षाचालक कुठे गेला हे दिसून आले नाही. आरोपी रिक्षाचालकाने त्या मुलीला सातारा रोडवरील एका इमारतीच्यावर नेऊन तिच्यावर अत्याचार केला.
सातारा रोडवर ही सहा वर्षाची मुलगी सापडली. काही मिनिटात पोलिसांनी आरोपीला पकडून, त्याच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. आरोपी रिक्षाचालकाचे नाव सागर मांढरे (वय-३९) असे आहे.