- अनधिकृत होर्डिग्ज, फ्लेक्स व किऑक्सवर होणार धडक कारवाई…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी दि. ११ सप्टेंबर २०२१) :- पावसाळा व करोना संसर्गामुळे न्यायालयाने बांधकामे व घरांवर कारवाई करण्यास ३० सप्टेंबरपर्यंत स्थगिती दिली आहे. त्यामुळे महापालिकेने अनधिकृत बांधकामेव अतिक्रमणावर कारवाई थांबविली आहे.मात्र, महापालिकेने अनधिकृत होर्डिग्ज फ्लेक्स व किऑक्सवर कारवाई मोहीम हातीघेतली आहे. कारवाई अधिक तीव्र व्हावी म्हणून क्षेत्रीय कार्यालयानिहाय असलेल्या अनधिकृत बांधकाम, अतिक्रमण नियंत्रण व निर्मूलन विभागाच्या पथकास ‘धडक कारवाई पथक’ असे नाव ठेवण्यात आले आहे.
पिंपरी चिंचवड शहरात मिळेल त्या जागेत अनधिकृत बांधकामे केली जात आहेत. रेड झोन, आरक्षित जागा व निळ्या पूर रेषेतही बांधकामे करून इमारतीतील सदनिका विकल्या जात आहेत. मोकळ्या जागा व रस्त्यांच्या कडेला पत्राशेड व टपऱ्या उभ्या राहत आहेत. त्या ठिकाणी तातडीने पाणी, वीज व ड्रेनेजची व्यवस्था केली जात आहे.
त्या पथकात प्रत्येकी १ परवाना निरिक्षक, बीट निरिक्षक, सुरक्षारक्षक व पोलिस कर्मचारी, ८ मजूर आणि महाराष्ट्र सिक्युरिटी फोर्सचे २ रक्षक यांचा समावेश असणार आहे. मोठ्या बांधकामांवर व इतर अनधिकृत बांधकामांवर न्यायालयाची स्थगिती उठल्यानंतर पुढील महिन्यात कारवाई केली जाणार आहे.













