- शहरातील या शाळांचा ‘हम करे सो कायदा’..
- युवक काँग्रेस अल्पावधीत खासगी शाळांविरोधात जनआंदोलन उभारणार…!
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १५ सप्टेंबर २०२१) :- शहरातील काही खाजगी शाळांचा गेल्या काही वर्षांपासून सातत्याने गैरकारभार सुरू आहे. शासकीय नियंमांची पायमल्ली केली जात असल्याने अनेक पालकांना त्रास होत आहे. पालिकेच्या शिक्षण मंडळाने प्राप्त तक्रारीच्या अनुषंगाने केलेल्या पत्रव्यवहारास व मागविलेल्या माहीतीस न जुमानता शहरातील अमृता विद्यालय, कमल नयन बजाज स्कूल, सेंट ॲन्ड्रूस स्कूल, आचार्य आनंद ऋषी स्कूल, एसएनबीपी स्कूल (रहाटणी, चिखली, मोरवाडी आणि मोशी शाखा) या शाळा टोलवाटोलवी करीत आहेत.
तक्रारीत प्रामुख्याने नियमबाह्य पध्दतीची प्रवेश प्रक्रिया राबविणे, प्रवेशासाठी अतिरिक्त पैसे घेणे, शासन नियमांना डावलून वारंवार फीसाठी त्रास देणे न दिल्यास ॲानलाईन शिक्षण बंद करणे, शिक्षण हक्क कायद्यातील शालेय नियमावलीचे पालन न करणे, नियमबाह्य कारभार करणे, मुख्याध्यापक नेमणूक निकषांचे उल्लंघन, अल्प संख्याक दर्जा प्राप्त असताना निसमावली न पाळणे, पालकांशी गैर वर्तन करणे तसेच प्रशासकीय बाबींचे पालन न करणे, वेळेत माहीती न पुरवणे या तक्रारीचां समावेश आहे.
युवक काँग्रेस शहराध्यक्ष नरेंद्र बनसोडे व नॅशनल स्टूडंस युनियन ॲाफ इंडियाचे राज्य उपाध्यक्ष ॲड. उमेश खंदारे यांनी शालेय शिक्षणमंत्री प्रा. वर्षाताई गायकवाड, शिक्षण आयुक्त विशाल सोळंकी, प्राथमिक शिक्षण संचालक दत्तात्रय जगताप, शिक्षण उपसंचालक औदुंबर उकिरडे तसेच पिंपरी चिंचवड महानगरपालिका शिक्षण मंडळाकडे याबाबत पुराव्यासहीत लेखी तक्रारी केल्या आहेत.
राजकीय धनदांडग्याचे अभय असल्याने ठराविक शाळांवर शासकीय अधिका-यांवर कारवाई न करण्यासाठी दबाव येत आहे. नाव न सांगण्याच्या अटीवर खुद्द शासकीय अधिका-यानेचा असा खुलासा केलाय. निगडीतील अमृता विद्यालयाची मान्यता रद्दचा प्रस्ताव शासनाकडे पाठविण्यात आल्याचे शिक्षण मंडळाकडून समजते. अन्य शाळांच्या बाबतीत शिक्षण विभागाच्या वरिष्ठांचे आदेश असूनही अजून कारवाई झाली नाही. पालकांना व नागरिकांना वेठीस धरू शासन नियमांची पायमल्ली करणा-या शाळांविरोधात आंदोलनाच्या माध्यमातून तीव्र भुमिका घेणार आहे. ज्या शाळा पालकांना त्रास देत असतील; त्यांनी युवक काँग्रेस किंवा एनएसयुआयशी संपर्क साधावा – मा. नरेंद्र बनसोडे (शहराध्यक्ष, शहर युवक काँग्रेस)…