- नगरसेविकेचे फोन रेकॉर्डींग प्रकरण अंगलट..
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १५ सप्टेंबर २०२१) :- नगरसेविकेसोबत मोबाइल फोनवर झालेले संभाषण रेकॉर्ड करून विभागप्रमुखांना पाठविणे उप अभियंत्याला महागात पडले. अतिरिक्त आयुक्त विकास ढाकणे यांनी या उपअभियंत्याला सक्त ताकीद दिली.
महापालिकेच्या ‘ ह ‘ क्षेत्रीय कार्यालयात उपअभियंता या जबाबदारीच्या पदावर अभियंता कार्यरत आहेत. नगरसेवक महापालिकेच्या संबंधित वॉर्डाचे लोकसेवक म्हणून प्रतिनिधित्व करतात. त्याअनुषंगाने नागरिकांना भेडसवणाऱ्या समस्या तक्रारींसंदर्भात नगरसेवक अधिकारी कर्मचाऱ्यांशी मोबाइलद्वारे संपर्क साधून प्रश्न सोडवितात.
त्या अभियंत्यांनी एका नगरसेविकेसोबत मोबाइलवर झालेले संभाषण रेकॉर्ड केले. ते दुसऱ्या नगरसेवकाला ऐकविल्याचा आरोप संबंधित नगरसेविकेने सर्वसाधारण सभेत केला होता. त्याची चौकशी करण्यासाठी एक सदस्यीय समिती गठित केली होती. संभाषण व्हायरल झाले. शहर अभियंता, कार्यकारी अभियंत्याला रेकॉर्डिंग पाठविले होते. मात्र, रेकॉर्डिंग व्हायरल केले नसल्याचा खुलासा अभियंत्याने यांनी केला. त्यामुळे प्रत्यक्षात रकॉर्डिंग कोणी व्हायरल केले याबाबत स्पष्टता होत नसल्याने रेकॉर्डिंगची तांत्रिक तपासणी करण्याची शिफारस समितीने केली. हे रेकॉर्डिंग कोणाकडेही उपलब्ध नाही. त्यामुळे सायबर सेल विभागाकडे पाठवून शहानिशा करणे शक्य नाही. असे विभागप्रमुखांनी कळविले. सबंधित उपअभियंता यांनी महापालिका वर्तणूक नियमातील तरतुदीचा भंग केला. त्यामुळे धुमाळ यांना सक्त ताकीद दिली आहे.












