- आईची मुलासह त्याच्या साथीदारांविरोधात पोलिसात तक्रार…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २७ सप्टेंबर २०२१) :- घरातील पिवळ्या धातूचे दागिने फिर्यादीच्या मुलासह त्याच्या तीन साथीदारांनी चोरी केले. ते सोन्याचे दागिने चोरीचे आहेत, असे माहीत असतानाही सोनार आरोपीने दागिने खरेदी केले. दागिने चोरीला गेल्याचे निदर्शनास आल्यानंतर ४६ वर्षीय महिलेने रविवारी (दि. २६) वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली.
ही घटना १३ एप्रिल ते २४ सप्टेंबर २०२१ दरम्यान थेरगाव येथील जय मल्हारनगर येथे घडली. पोलिसांनी गुन्हा दाखल करून फिर्यादी महिलेचा मुलगा वैष्णव कालिदास शेळके (वय २३, रा. मल्हार नगर) याच्यासह त्याचे साथीदार हर्षद शांताप्रकाश शास्त्राना (वय २०, रा. थेरगाव), हर्षद सुरेंद्र कांबळे (वय १८, रा. थेरगाव), अनिकेत दीपक सुतार (रा. वाकड) तसेच चोरीचे दागिने खरेदी करणारा विजय रामचंद्र विस्पुते (विजय ज्वेलर्स, पिंपळे निलख, सांगवी) या आरोपींना अटक केली आहे. वाकड पोलीस तपास करीत आहेत.
















