- चिंचवड पोलीस ठाण्यातील घटना; आरोपी अटकेत…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २८ सप्टेंबर २०२१) :- चिंचवड पोलीस ठाण्यातील तपास पथकाच्या कक्षात पोलिसांना धक्काबुक्की करून मारहाण केली. सरकारी कामात अडथळा आणल्याप्रकरणी एकाला अटक केली. ही घटना रविवारी (दि. २६) दुपारी १ वाजेच्या सुमारास घडली.
लुकमान इस्माईल शेख (वय ५६ रा. वेताळनगर, चिंचवड) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. पोलीस कर्मचारी अमोल माने यांनी या प्रकरणी चिंचवड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. आरोपी लुकमान शेख याचा मुलगा समीर लुकमान शेख हा कोयता बाळगताना मिळून आला.
फिर्यादी हे तपास पथकात कर्तव्य बजावत असताना ते समीर शेख याच्याकडे चौकशी करून तपास करीत होते. त्यावेळी आरोपी चिंचवड पोलीस ठाण्याच्या तपास पथकाच्या कक्षांमध्ये आला. तेथे त्याने आरडाओरडा करून तपास पथकाचे ऑफिसमध्ये घुसून फिर्यादीच्या कामात अडथळा निर्माण केला. तसेच फिर्यादी व सहकाऱ्यांना धक्काबुक्की करून मारहाण केली.