- आयुषच्या कामगिरीचे कौतुक करीत आयपीएस अधिकारी होण्याचा दिला सल्ला…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २८ सप्टेंबर २०२१) :- स्वतःच्या जीवाची पर्वा न करता पाण्यात बुडत असलेल्या दोघांचे जीव वाचवणाऱ्या बालवीराचा पोलिस आयुक्त कृष्ण प्रकाश यांच्या हस्ते गौरव करण्यात आला. मंगळवारी (दि. २८) सायंकाळी पोलिस आयुक्त कार्यालयात हा कार्यक्रम घेण्यात आला.
आयुष गणेश तापकीर (वय १३, रा. गुळवेवस्ती, भोसरी) असे गौरव करण्यात आलेल्या बालवीराचे नाव आहे. म्हैस चरण्यासाठी गेलेल्या आयुषने स्वतःच्या जीवाची पर्वा न करता पाण्यात उडी मारून बुडणाऱ्या मुलांना बाहेर काढले. समाजाच्या सर्व स्तरातून कौतुक होत आहे. माध्यमांच्या प्रतिनिधींशी बोलताना आयुषने त्यावेळी मनाला जे योग्य वाटले तेच आपण केल्याचे सांगितले.
पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश यांनी आयुषला बोलावून त्याची पाठ थोपटली. अडचणीच्या काळात मदत मुलांना केल्याने दोन जीव वाचले आहेत. त्याने दाखवलेल्या या धाडसाची खरच दाद द्यावी लागेल, अशा शब्दात आयुषच्या कामगिरीचे कौतुक केले. त्याने चांगला अभ्यास करून आयपीएस अधिकारी व्हावे, असेही ते कौतुक करताना ते म्हणाले.