- महावितरणाचे स्पष्टीकरण…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १२ ऑक्टोबर २०२१) :- महावितरणच्या भोसरी विभाग अंतर्गत निगडी प्राधीकरण उपविभाग कार्यालयामध्ये सोमवारी (दि. ११) दुपारच्या सुमारास दोन अधिकाऱ्यांमध्ये तुंबळ हाणामारी झाल्याची बातमी सोशल मिडियाच्या माध्यमातून प्रसारित होत आहे. मात्र, या बातमीमध्ये कोणत्याही प्रकारचे तथ्य नाही व त्यात वस्तुस्थितीचा विपर्यास करण्यात आला आहे.
या दोन अधिकाऱ्यांमध्ये गैरसमजातून केवळ शाब्दीक वाद झाला होता आणि चर्चेनंतर तो संपुष्टात आला. मात्र या प्रकारास अतिरंजित स्वरुप देऊन दोन अभियंत्यांमध्ये तुंबळ हाणामारी झाल्याची बातमी सोशल मिडियाद्वारे प्रसारित होत आहे.
तथापि, हाणामारीचा कोणताही प्रकार घडलेला नाही. केवळ ऐकीव माहितीवरून ही माहिती प्रसारित होत असल्याचे लेखी स्पष्टीकरण संबंधीत अधिकाऱ्यांनी महावितरणच्या वरिष्ठांना दिले आहे.