- पार्थ पवारांकडून चक्क शायरीद्वारे सत्ताधाऱ्यांना इशारा…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १४ ऑक्टोबर २०२१) :- आयकर विभागाने उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नातेवाईकांवर धाडी टाकल्यानंतर अजित पवार यांचे सुपुत्र आणि युवक नेते पार्थ पवार यांनी ट्विटरवरुन शायरीद्वारे भाजपला इशारा दिला आहे.
पिंपरी चिंचवडमधील इंद्रायणी नदी प्रकल्पाच्या कामात भ्रष्टाचार होत असल्याचा आरोप पार्थ पवार यांनी केला आहे. ‘सर्वांच्याच अस्मितेचा विषय आणि मातेसमान नदीतून पैसे खाण्याचा उद्योग पिंपरी चिंचवड भाजपने चलविल्याची तक्रार प्राप्त झाली आहे. पवना व इंद्रायणी नदी सुधार प्रकल्पातील भ्रष्टाचाराच्या आम्ही मुळापर्यंत जाणार, हीच का स्मार्ट सिटी? असा सवाल पार्थ पवार यांनी विचारला आहे. त्यानंतर, पार्थ यांनी शायरी ट्विट करुन पुन्हा एकदा मेसेज दिला आहे.
‘सिर्फ हंगामा खड़ा करना मेरा मकसद नहीं, मेरी कोशिश है कि ये सूरत बदलनी चाहिए।’ अशी शायरी पार्थ यांनी ट्विट केली आहे.
“सिर्फ हंगामा खड़ा करना मेरा मकसद नहीं,
मेरी कोशिश है कि ये सूरत बदलनी चाहिए।”Accountable governance in PCMC & action only against those corrupt, “party hopping” individuals running the corporation – that’s what I am asking for. Nothing more, nothing less.
— Parth Sunetra Ajit Pawar (@parthajitpawar) October 13, 2021
















