- शिवसेनेला बाय बाय करीत पुन्हा राष्ट्रवादीत प्रवेश…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १४ ऑक्टोबर २०२१) :- पिंपरी-चिंचवड महापालिकेचे माजी नगरसेवक नारायण बहिरवाडे यांनी शिवसेनेला बाय बाय करीत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत आज गुरुवारी (दि. १४) रोजी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे. २०१७ निवडणुकीदरम्यान बहिरवाडे यांनी राष्ट्रवादी सोडून शिवसेनेत प्रवेश केला होता.
मुंबईतील राष्ट्रवादी काँग्रेसच्या पक्ष कार्यालयात हा प्रवेश सोहळा झाला. राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष संजोग वाघेरे, माजी विरोधी पक्षनेते नाना काटे यावेळी उपस्थित होते.
राष्ट्रवादी काँग्रेसमधील सर्व नेत्यांशी माझे जिव्हाळ्याचे संबंध आहेत. सर्वांनी स्वगृही येण्याचा आग्रह केला. अजितदादांनी खूप आपुलकीने पक्षात स्वागत केले. त्यांचे मी आभार मानतो. स्वगृही परतल्याचे समाधान आहे. पक्ष जी जबाबदारी देईल ती स्वीकारणार असल्याचे बहिरवाडे यांनी सांगितले.
















