- आरोपीकडून मुलीच्या कुटुंबाची वाट लावण्याची धमकी…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १४ ऑक्टोबर २०२१) :- १७ वर्षीय अल्पवयीन मुलगी मेकअपचे साहित्य आणण्यासाठी सांगवीतील क्रांती चौकात गेली असता तिथं आरोपीने मुलीचे हात आणि पाय पकडून विनयभंग करीत ‘तू माझ्याशी लग्न कर, अन्यथा मी माझा हात कापून घेईल, अशी धमकी दिली.
मुलीने घाबरून मुलाच्या हाताला हिसका देत घरी पळ काढला. मुलीने आई वडिलांना हकीगत सांगितली. मुलगा पाठलाग करीत मुलीच्या घराजवळ पोहोचला. मुलीच्या वडिलांनी ‘मुलीला छेडतो का’ असे म्हणून आरोपी तरुणाला चोपले.
आरोपीने दोन मित्रांना बोलावून ‘मी आताच जेलमधून सुटून आलो आहे. मी मर्डर केलेला आहे. मी कोयता घेऊन येऊन तुमची वाट लावतो’ असे म्हणत शिवीगाळ करत पीडित मुलीच्या वडिलांना धमकी दिली आहे. पीडित मुलीचे कुटुंब भयभीत झाले असून, आरोपी फरार आहे. सांगवी पोलीस तपास करत आहेत.