- प्रेक्षकांना शेकडो कलाकारांची कला अनुभवता येणार…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २१ ऑक्टोबर २०२१) :- करोनाच्या पार्श्वभूमीवर नाट्यगृह बंद असल्याने प्रत्यक्ष प्रेक्षकांसमोर कलाकारांना आपली कला सादर करता आली नाही. दरम्यान आता कलाकार आणि प्रेक्षकांना एकत्र आणण्यासाठी थिएटर वर्कशॉप प्रस्तुत रंगयात्री (रसिककला सेतू) महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे.
या महोत्सवामुळे प्रेक्षकांना १५ दिवसांत २५ हून अधिक संस्था आणि २५०-३०० कलाकारांची कला अनुभवता येणार आहे. हा महोत्सव संस्थेच्या चिंचवड येथील ‘पैस रंगमंचा’ वर कोविडसंबंधी सर्व काळजी घेऊन मोजक्या प्रेक्षक उपस्थितीत संपन्न होणार आहे. प्रेक्षक आणि कलाकारांसाठी हा महोत्सव नि:शुल्क आहे. महापौर माई ढोरे यांच्या हस्ते महोत्सवाचे उद्घाटन होणार आहे. यावेळी आयुक्त राजेश पाटील यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे, अशी माहिती आयोजक प्रभाकर पवार यांनी दिली.