साहित्यिक तुपे यांना मुख्यमंत्री सहायता निधीतून पाच लाखांची मदत.
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १९ जाने.) :- उद्योजक अमित गोरखे यांच्या विशेष पुढाकाराने व मातंग ग्रुप डेव्हलपमेन्ट (MGD) या शिष्टमंडळाने वर्षा निवासस्थानी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची नुकतीच भेट घेतली होती.
त्यावेळी जेष्ठ साहित्यिक उत्तम बंडू तुपे यांना आर्थिक मदतीसाठीचे निवेदन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना दिले होते. मुख्यमंत्री फडणवीस यांनी उत्तम बंडू तुपे यांना लवकरच शासन पातळीवर मोठी मदत जाहीर करू, असे आश्वासन दिले होते.
या शिष्टमंडळात सुनिल वारे, डॉ. बी. एन. गायकवाड, सचिन कुचेकर, शेखर साळवे, संकेत लोंढे व इतर मान्यवरांचा सहभाग होता.
शिष्टमंडळाच्या मागणीची दखल घेत मुख्यमंत्री फडणवीस यांनी शुक्रवार (दि. १८) रोजी ज्येष्ठ साहित्यिक उत्तम तुपे यांना मुख्यमंत्री सहायता निधीतून पाच लाखांचा धनादेश देण्याची घोषणा केली व गृह राज्यमंत्री (शहरे) डॉ. रणजित पाटील यांच्या हस्ते तुपे यांना पाच लाखांचा धनादेशही सुपूर्द केला आहे.











