न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १९ जाने. ) :- ज्येष्ठ साहित्यिक ‘झुलवाकार’ उत्तम बंडु तुपे यांनी त्यांच्या उमेदीच्या काळात साहित्य रसिकांना आपल्या साहित्याच्या जोरावर मंत्रमुग्ध केले होते. आज मराठी साहित्यातील एक नामवंत सुप्रसिध्द लेखक आपल्या अंतिम क्षणी कठीण काळातून जात आहे.
यासाठी शासनाने त्यांना आर्थिक पाठबळ देण्यासाठी पुढे येवून, जमेत तेवढी मदत करावी तसेच शासनाने त्यांच्या साहित्यीक योगदानाची दखल घेत, त्यांना पद्मश्री पुरुस्काराने सन्मानीत करावे, अशी मागणी काही दिवसांपूर्वी शिवसेना तिरोडा विधासभेचे संपर्कप्रमुख व शिवशाही व्यापारीसंघाचे प्रदेशाध्यक्ष युवराज दाखले यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली होती.
या मागणीचा विचार करून ज्येष्ठ साहित्यिक उत्तम तुपे यांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री सहायता निधीतून पाच लाखांची आर्थिक मदत जाहीर केली आहे. तसेच त्यांना गृह राज्यमंत्री डॉ. रणजित पाटील यांच्या हस्ते पाच लाखांचा धनादेशही सुपूर्द केला आहे. याबाबत प्रतिक्रिया देताना दाखले म्हणाले की, शासनाने पहिली मागणी मान्य केली असून, लवकरच त्यांना पुरस्कार देण्याची तजवीजही करावी. शासनाने आर्थिक मदत केल्याबद्दल समाधानही व्यक्त केले आहे.











