- पुनावळेतील घटना; दोघांविरोधात गुन्हा दाखल…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ३० ऑक्टोबर २०२१) :- आम्हाला नवीन डायनिंग हॉल टाकायचे आहे. त्यात तुम्हालाही पार्टनर घेतो आणि त्यासाठी मला काही पैशांची गरज आहे. तू त्यामध्ये गुंतवणूक कर असे म्हणून आरोपींनी फिर्यादी यांच्याकडून पावणे सात लाख रुपये घेतले.
मात्र, आरोपींनी हॉटेल सुरु न करता तसेच त्यांचे पैसे परत न करता फिर्यादी यांची फसवणूक केली. ही घटना ३ ऑक्टोबर २०१९ ते १९ जून २०२० दरम्यान पुनावळे येथे घडली.
अमित सूर्यकांत नौबदे (वय ३१, रा. पुनावळे) यांनी गुरुवारी (दि. २८ ऑक्टोबर) वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. राहुल हरसोट, केतन हरसोट (दोघे रा. नाशिक) यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. वाकड पोलीस तपास करीत आहेत.











