- थेरगावमधील घटना; पत्नीकडून आरोपी विरोधात गुन्हा दाखल…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ३० ऑक्टोबर २०२१) :- गाडीच्या व्यवहारावरुन आरोपींनी मानसिक त्रास दिल्याने त्याने आत्महत्या केल्याचे फिर्यादीने फिर्यादीत म्हटले आहे. ग्रॅंड कासा बिल्डिंग, थेरगाव येथे गुरुवारी (दि. २८) दुपारी ही घटना घडली.
आत्महत्या केलेल्या इसमाच्या पत्नीने शुक्रवारी (दि. २९) वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. अमोल कांबळे, नितीन माने (दोघेही रा. सातारा), संकेत भोसले, पवन कड आणि इतर एक जणांविरोधात आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. वाकड पोलीस अधिक तपास करत आहेत.











