पिंपरी पोलीस ठाण्यात आरोपींवर गुन्हा दाखल…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०१ नोव्हेंबर २०२१) :- जबरदस्तीने अनैसर्गिक शारीरिक संबंध ठेवून महिलेवर तिच्या पतीने अत्याचार केला. तसेच मनास लज्जा उत्पन्न होईल, असे कृत्य करून सासऱ्याने विनयभंग केला. पिंपरी येथे २८ एप्रिल २०१८ पासून ते २९ मार्च २०२० कालावधीत ही घटना घडली.
पीडित विवाहितेने या प्रकरणी शनिवारी (दि. ३०) पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार विवाहितेचा पती, सासरा आणि महिला यांच्या विरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केला.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपींनी संगनमत करून फिर्यादीला वेळोवेळी मानसिक व शारीरिक त्रास दिला. फिर्यादीच्या माहेरच्या लोकांविषयी वाईट बोलून मानसिक त्रास दिला. फिर्यादी विवाहितेच्या सासऱ्याने जवळीक साधून फिर्यादीच्या एकांतपणाचा फायदा घेऊन मनाला लज्जा उत्पन्न होईल, असे कृत्य केले तसेच आरोपी पतीने फिर्यादीला वेळोवेळी हाताने मारहाण करून फिर्यादीच्या मनाच्या विरुद्ध त्यांच्याशी जबरदस्तीने अनैसर्गिक शारीरिक संबंध प्रस्थापित केले, असे फिर्यादीत नमूद आहे.












