- अज्ञाताविरोधात वाकड पोलिसात गुन्हा दाखल…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २९ नोव्हेंबर २०२१) :- पिंपळे सौदागर येथील जगताप डेअरी चौकातील स्पाॅट १८ मॉलमध्ये १८ डिग्रीज रूफ टाॅप रेस्टोलॉन्च पबमध्ये रविवारी रात्री (दि. २८) पीडित महिला आणि तिचे मित्र पार्टीमध्ये डान्स करत होते.
फिर्यादी या डिजेला गाणे बदलण्यास सांगत असताना आरोपी अनोळखी व्यक्ती फिर्यादी यांच्या मागे आला. आरोपी डीजेला म्हणाला, ‘मॅडम जो गाना बोल रही है वही बजना चाहिये रातभर’, असे म्हणून आरोपीने फिर्यादी यांच्याशी गैरवर्तन केले आहे, असे फिर्यादीत म्हटले आहे.
पीडित महिलेच्या तक्रारीनुसार एका अनोळखी व्यक्तीच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. वाकड पोलीस तपास करीत आहेत.