- लाखापेक्षा अधिक विद्यार्थी परीक्षेस गैरहजर…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २९ नोव्हेंबर २०२१) :- पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयांतर्गत पोलीस शिपाई पदाच्या ७२० जागांसाठी भरती प्रक्रिया सुरु आहे. पहिल्या टप्यातील लेखी परीक्षेत राज्यभरातून तब्बल एक लाख ८९ हजार ७३२ अर्ज आले होते. ८२ हजार ६०८ उमेदवारांनी लेखी परीक्षा दिली आहे.
या उमेदवारांची १९ नोव्हेंबर रोजी लेखी परीक्षा झाली. पुणे, अहमदनगर, सोलापूर, औरंगाबाद, नाशिक, नागपूर या जिल्ह्यातील ४४४ परीक्षा केंद्रावर ही परीक्षा पार पडली. या परीक्षेला एक लाख सात हजार १२४ विद्यार्थी गैरहजर राहिले.
दोन उमेदवारांना सर्वाधिक ९८ गुण मिळाले आहेत. तर ६१५ उमेदवारांना ९० पेक्षा अधिक गुण मिळाले आहेत. सहा उमेदवारांना अक्षरशः शून्य गुण मिळाले आहेत. तर ४१ जणांना १० देखील गुण मिळालेले नाहीत. या लेखी परीक्षेच्या १:१० वर्गवारीनुसार निकाल व मैदानी चाचणी लवकरच घेतली जाणार आहे.