- मृतदेह महापालिका आवारात दफन करण्याचा इशारा…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ११ डिसेंबर २०२१) :- पिंपरी चिंचवड महापालिकेने थेरगाव-काळेवाडी परिसरातील मुस्लिम बांधवांच्या दफनभूमीसाठी जागा आरक्षित करावी, या मागणीसाठी कब्रस्तान संघर्ष समितीच्या वतीने वाकड, शेख वस्ती, काळाखडक, गुजरनगर, डांगेचौक, थेरगाव, काळेवाडी, कोकणेनगर, पवनानगर, पिंपळे निलख अशा अनेक ठिकाणी बैठका घेतल्या.
शुक्रवारी काळेवाडीमधील जामा मस्जिद, अबू हुरेरा मस्जिद, मक्का मस्जिद काळेवाडी फाटा, पवनानगर मस्जिद या ठिकाणी बैठक संपन्न झाली. त्यात मुस्लिम बांधवांकडून दफनभूमीच्या जागेसाठी केलेला पत्रव्यवहार व पुन्हा नव्याने आयुक्तांना दफनभूमीच्या मागणीसाठी दिलेल्या निवेदनावर तात्काळ कारवाई न झाल्यास तीव्र आंदोलन करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
या बैठकांमध्ये मुस्लिम बांधवानी आक्रमक पवित्रा घेत, परिसरामध्ये मुस्लिम बांधवांची मयत झाल्यास त्या व्यक्तीचा मृतदेह दफन करण्यासाठी जागा नसल्याने पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या इमारतीच्या परिसरामध्ये दफन करण्याचा इशारा दिला आहे.