- अपघातात पती-पत्नीचा मृत्यू; वाहन मालकाविरोधात गुन्हा दाखल…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ११ डिसेंबर २०२१) :- दुचाकीवरून सांगुर्डे, देहूगाव येथे जात असताना चिखली-देहू रस्त्यावर शेलारवस्ती येथे आरोपीच्या भरधाव चारचाकी वाहनाने दुचाकीला धडक दिली. यात फिर्यादीचे आई वडील गंभीर जखमी होऊन त्यांचा मृत्यू झाला.
बाळू बाबुराव उगवे (वय ६३) आणि मीरा बाळू उगवे (वय ५२), अशा अपघातात मृत्यू झालेल्या पति-पत्नीचे नाव आहे. मनोज बाळू उगले (वय ३२, रा. संत तुकाराम नगर, भोसरी) यांनी चिखली पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. चार चाकी वाहन चालक नेताजी भिसे (रा. भोसरी) याच्याविरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.