- न्यू सिटि प्राईड स्कूलमध्ये प्रजासत्ताक दिन साजरा
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
रहाटणी (दि. २८ जाने.) :- क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिबा फुले एज्युकेशन फाऊंडेशन संचालित, न्यू सिटि प्राईड इंग्लिश मिडियम स्कूल येथे प्रजासत्ताक दिन उत्साहात सजारा करण्यात आला. नगरसेविका निर्मला कुटे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. या निमित्ताने विविध संस्कृतीक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
यावेळी चेअरमन स्वराज नागरिक पतसंस्था सुनील कुंजीर, सामाजिक कार्यकर्ते आर. डी. भालेराव, अनिता तुतारे, भगवान गोडांबे, माजी पोलीस निरीक्षक सुरेश भालेराव, आबा पांढरे, संतोष कापसे, इंद्रजीत काटे, राजेश गायकवाड, तात्या शिनगारे, स्वप्नील भालेराव, शर्वरी जमालकर, बाळासाहेब शेडगे, युवराज प्रगणे, संस्थेचे संस्थापक अरुण चाबूकस्वार, संदीप चाबूकस्वार, मुख्याध्यापिका श्राबनी पत्रनाभिश यासह शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, पालक, विद्यार्थी उपस्थित होते.
शाळेमध्ये विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते, तसेच कार्यक्रमाच्या निमित्ताने विद्यार्थ्यांना क्रीडा स्पर्धेचे बक्षीस वितरण करण्यात आले. विद्यार्थ्यानी देशभक्ती गीत, संस्कृतिक कार्यक्रमात सहभागी होऊन कार्यक्रमांची शोभा वाढवली. विद्यार्थ्यानी कराटे प्रात्यक्षित सादर केले.
“भारतीय संविधानाचे निर्माते डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी २ वर्षे ११ महिने १७ दिवसात परिश्रम घेऊन स्वत: आजारी असतांना एकट्याने संविधान लिहिले. त्यामुळेच जगातील सर्वात मोठी लोकशाही आणि सर्वश्रेष्ठ संविधान आपल्या देशात आहे व भारतीय संविधानामुळेच देश अखंड व अभेद्य आहे.” संस्थेचे संस्थापक अरुण चाबूकस्वार यांनी असे उदगार काढले. या विविध कार्यक्रमानी सजलेल्या प्रजासताक दिनाचे विद्यार्थ्यांना खाऊ वाटप करून सांगता करण्यात आली.
स्वरूपा पौड आणि साक्षी वाघमारे यांनी सूत्रसंचालन केले. आस्था महातो हिने आभार व्यक्त केले.











