न्यूज पीसीएमसी नेटवर्क
हिंजवडी (दि. २८ जाने.) :- हिंजवडी पोलिसांनी व्हॉट्स ऍप उपक्रम राबवला असून बेवारस वाहनांची माहिती संबंधित क्रमांकावर पाठवावी असे आवाहन करण्यात आले आहे. हिंजवडी पोलिसांकडून ८२०८७८६४९९ हा व्हॉट्सअप क्रमांक प्रसारित करण्यात आला आहे. वाहनाच्या फोटोबरोबच रस्त्याचे नाव, अंदाजे किती दिवसांपासून वाहन रस्त्यावर उभे आहे, तसेच इतर माहिती असल्यास द्यावी.
हिंजवडी वाहतूक विभागाच्या हद्दीत येणारे कस्पटे चौक ते वाकड चौक, मानकर चौक ते काळेवाडी फाटा चौक, काळेवाडी फाटा चौक ते डांगे चौक, डांगे चौक ते वाकडगाव चौक (दत्त मंदिर रोड), उत्कर्ष चौक ते छत्रपती शिवाजी चौक (वाकडगाव), डांगे चौक ते बिर्ला चौक, थेरगाव फाटा ते तापकीर चौक, डांगे चौक ते लंडन ब्रिज, डांगे चौक ते भुमकर चौक, चांदणी चौक ते किवळे ब्रिज (महामार्गाच्या दोन्ही बाजुस), भुमकर चौक ते शिवाजी चौक, मारुंजी वाय जंन्शन ते लक्ष्मी चौक, वाकड ब्रिज ते शिवाजी चौक, हिंजवडी व मान आयटी परिसरामधील फेज१, फेज २, फेज ३ याच रस्त्यांची माहिती द्यावी, असे आवाहन केले आहे.















