- वाकड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०७ जानेवारी २०२१) :- घरातील सोफासेट ओएलएक्स सेलिंग पोर्टलवर विकण्यासाठी ३० डिसेंबर रोजी फिर्यादीने जाहिरात दिली. त्यानंतर त्यांना 7236975405, 9569165480 या क्रमांकावरुन फोन आले. सोफा विकत घेतो, असे सांगून फोनवरील व्यक्तीने पैसे पाठवल्याचा बहाणा करुन फिर्यादीला क्यू आर कोड स्कॅन करायला लावला.
त्याद्वारे त्यांची ४५ हजारांची फसवणूक केली. त्यांनतर आरोपींनी फिर्यादीच्या क्रेडिट कार्डमधून ३९ हजार ५०४ रुपये काढून घेत त्यांची एकूण ८४ हजार ५०४ रुपयांची ऑनलाईन फसवणूक केली. हा प्रकार ३० डिसेंबर ते २ जानेवारी दरम्यान वाकड रोड, वाकड येथे घडली.
प्रणव सुधाकर मुळे (वय ४१, रा. वाकड रोड, वाकड) यांनी गुरुवारी (दि. ६) याप्रकरणी वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार अज्ञाताच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. वाकड पोलीस तपास करीत आहेत.