पालिका आयुक्तांकडून नव्याने आदेश पारित…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०७ जानेवारी २०२१) :- पिंपरी – चिंचवड महापालिकेने ३१ डिसेंबर २०२० पूर्वीचे अनधिकृत बांधकामे नियमितीकरणासाठी २१ फेब्रुवारी २०२२ पर्यंत अर्ज मागविले आहेत. त्यातील तीन जाचक अटी रद्द करण्याबाबत आयुक्त राजेश पाटील यांनी आज शुक्रवारी (दि. ७) रोजी नव्याने आदेश पारित केले आहेत.
त्यात करसंकलन विभागाचा ना – हरकत दाखला सादर करण्याऐवजी मिळकतधारकांनी मार्च २०२१ अखेर मिळकतीसाठी येणा-या नियमित कराचा भरणा करुन ना – हरकत दाखल्या ऐवजी पावती सादर करावी. पाणीपुरवठा विभागाचा ना – हरकत दाखल्याऐवजी मिळकतधारकांनी मार्च २०२१ अखेर मिळकतीसाठी येणा-या पाणी बिल रकमेचा भरणा केल्याबाबतची पावती सादर करावी. जलनिःसारण विभागाचा ना हरकत दाखल्या ऐवजी मिळकतधारकांनी मिळकतीकरीता घेण्यात आलेल्या ‘ ट्रेनेज कनेक्शन पुर्णत्वाचा दाखला या बाबींचा समावेश आहे.
गुंठेवारीनुसार बांधकाम नियमित करणे सुलभ व्हावे म्हणून हा निर्णय घेण्यात आला आहे. त्याचा फायदा शहरातील नागरिकांना होणार आहे.