- पालिकेकडून कामासाठी डिजिटल माध्यमांवर भर…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १२ जानेवारी २०२२) :- पिंपरी – चिंचवड शहरात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. त्या अंतर्गत महापालिका भवन व क्षेत्रीय कार्यालयात नागरिक, ठेकेदार, सामाजिक कार्यकर्ते यांना प्रवेश बंद करण्यात आला आहे.
ओमायक्रॉन व कोरोनांचे संक्रमण वेगात होत असल्याने रुग्णांची संख्या शहरात झपाट्याने वाढत आहे. त्यामुळे राज्य शासनाने सर्व शासकीय, निम शासकीय व महापालिका कार्यालयांमध्ये नागरिकांच्या प्रवेशावर निर्बंध आणले आहेत. त्यानुसार महापालिका भवन व क्षेत्रीय कार्यालयात नागरिक ठेकेदार, त्यांचे प्रतिनिधी व सामाजिक कार्यकत्यांना प्रवेश बंदी करण्यात आली आहे.
त्यासाठी प्रवेशद्वारावर दोर बांधण्यात आला आहे. नागरिकांना महापालिकेसंदर्भातील कामकाजाच्या ई – मेलद्वारे सूचना दिल्या जात आहेत. कॉन्फरन्सद्वारे नागरिकांच्या समस्यांचे निकारण करण्याचा प्रयत्न केला जात आहे. तरीही, तातडीचे काम असल्यास संबंधित अधिकाऱ्यांची पूर्वपरवानगी देऊन प्रवेश दिला जात आहे. लेखी पूर्वपरवानगी मिळाल्यास दुपारी ४ ते सायंकाळी यावेळेत अपवादात्मकरित्या प्रवेश दिला जात आहे. मात्र, त्या नागरिकांने कोरोनाचे दोन्ही डोस घेतलेले असणे बंधनकारक आहे.


















