- माजी नगरसेवक जितेंद्र ननावरे यांची आयुक्तांकडे मागणी…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १२ जानेवारी २०२२) :- करोना काळामध्ये शरीर तंदुरुस्त आणि संतुलित राखण्यासाठी व्यायामाची गरज असताना प्रशासनाकडून मैदाने बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. हा चुकीचा निर्णय असल्याची प्रतिक्रिया खेळाडूंमध्ये उमटत आहे. त्यामुळे करुन, ती पुन्हा खुली करण्याची मागणी माजी क्रीडा समिती सभापती जितेंद्र ननावरे यांनी महापालिका आयुक्तांकडे निवेदनाद्वारे केली आहे.
नव्या निबंधांमुळे खुली मैदाने बंद केल्याने नागरिक संताप व्यक्त करत आहेत. मैदाने बंद असल्याने पोलिस भरतीचा सराव करता येणार नाही. त्यामुळे पोलिस भरतीसाठी तयारी करणाऱ्या युवकांचे भवितव्य टांगणीस लागले आहे. सरावात होणाऱ्या खंडामुळे मैदानी स्पर्धाची तयारी करणाऱ्या खेळाडूच्या कामगिरीवर लक्षणीय परिणाम होऊ लागला आहे. शिवाय खेळाडूंचे वय निघून चाललेले आहे.
शाळा कॉलेज गेल्या दोन वर्षापासून बंद असलेने मुलांमध्ये मोबाइल गेम खेळण्याचे व्यसन लागले आहे. यातून बाहेर पडण्यासाठी मैदानी खेळ खेळणे मुलांना गरजेचे असल्याने प्रशासनाने याचा गांभीर्यपूर्वक विचार करून शहरातील मैदाने तातडीने सुरू करणे गरजेचे आहे. प्रशासनाने मैदाने बंद करण्याचा निर्णय मागे घेऊन तरूण युवक व लहान मुलांचे भविष्य वाचवावे. त्या उलट चित्रपटगृह, वाईन शॉप्स, हॉटेल, रेस्टॉरंट-बार सारख्या गोष्टींवर निर्बंध लावावेत, असे या निवेदनात ननावरे यांनी म्हटले आहे.


















