न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १७ जानेवारी २०२२) :- शंभूराजे राज्याभिषेक सोहळ्यानिमित्त किल्ले पुरंदर येथे शिवकार्य आणि सामाजिक कार्याची दखल घेत राजदादा तपसे यांना शहीदवीर पत्नी जाधवताई (सोलापुर) यांच्या हस्ते ” शंभूगौरव ” या विशेष पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
शिवकार्यातील गड-किल्ले संवर्धनात त्यांचा मोठा सहभाग असतो. छत्रपती शिवाजी महाराज आणि शंभुराजे यांच्या स्वराज्यामधील गडकिल्ल्यांचे संवर्धन आणि इतिहासाची साक्ष देणारे किल्ले अबाधित ठेवणे हाच उद्देश डोळ्यासमोर ठेवून पुढील कार्य करीत राहणार असल्याचे तपसे यांनी सांगितले.












