न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ३० जाने.) :- सुवर्णपुष्प संस्थेच्या वतीने पांचाळ सोनार समाजाचे राज्यस्तरीय ४ थे अधिवेशन रविवार (दि. ३ फेब्रु.) रोजी स. ८ ते सायं ८ यावेळेत विघ्नहर्ता पॅलेस मंगल कार्यालय, महंमदवाडी रोड, जाधव मळा, हडपसर, पुणे या ठिकाणी संपन्न होणार आहे.
यावेळी युवा महोत्सव, महिलाशक्ती मेळावा, सामुदायिक विवाह सोहळा व वधु-वर परिचय मेळावा आनंदोत्सवाचे आयोजन केले आहे. या सोहळ्यास सर्व समाजबांधवांनी उपस्थित राहण्याचे आवाहन सुवर्णपुष्प संस्थेचे अध्यक्ष योगेश आचार्य यांनी केले आहे.
या सामाजिक उपक्रमात सहभागी होण्यासाठी ९४२३५६७८९९ / ९९२३००२३५४ / ९०९६२८९९९९ या मोबाईल क्रमांकावर संपर्क साधावा.











