न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (१८ जानेवारी २०२२) :- पिंपरी चिंचवड महानगरपालिका कार्यक्षेत्रात मुख्य रस्त्याच्या कडेला अनेक झोपडपट्ट्या आहेत. तेथील झोपडपट्ट्या या वेड्या-वाकड्या पद्धतीच्या असल्यामुळे मुख्य रस्ते हे विद्रुप दिसतात.
शहरातील नामवंत व्यावसायिक कलाकार यांच्या मार्फत झोपडपट्टीच्या दर्शनी भागावर काही सुशोभिकरणाच्या दृष्टीने बदल करण्यास व त्याप्रमाणे रंगरंगोटी करण्याची मागणी शहर सुधारणा समितीच्या सभापती श्रीमती अनुराधा गणपत गोरखे यांनी प्रशासनाकडे केली होती.
त्यानुसार शहरातील झोपडपट्ट्यांपैकी आण्णा साहेब मगर नगर येथील झोपड्यांच्या दर्शनी भागावर प्रायोगिक तत्वावर रंगरंगोटी करण्यास सुरुवात करण्यात आली आहे.


















