- राष्ट्रवादी १४, अपक्ष दोन तर, भाजप एका जागेवर विजयी…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १९ जानेवारी २०२२) :- देहू नगरपंचायत झाल्यानंतर पहिल्याच निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसची सरशी झाली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसला १४ जागा मिळाल्याने एक हाती सत्ता आली आहे. भाजपला एका जागेवर समाधान मानावे लागले तर दोन अपक्षांनी बाजी मारली आहे.
देहूच्या निवडणुकीकडे सर्वांचे डोळे लागले होते. आमदार सुनिल शेळके आणी माजी मंत्री बाळा भेगडे यांनी प्रचाराचा धुरळा उडवला होता. त्यामुळे मतदान कोणाच्या पारड्यात जाणार याबाबत कुतूहल निर्माण झाले होते. १७ जागांसाठी एकूण ६० जण रिंगणात होते. त्यापैकी राष्ट्रवादीने १४ जागा जिंकून एक हाती सत्ता मिळवली आहे.
आमदार सुनील शेळके जल्लोषात सामील होण्यासाठी आले होते. त्यांनी मतदारांचे आभार मानले. भाजपला केवळ एका जागेवर समाधान मानावे लागले. तर दोन अपक्षांनी दोन जागा मिळवल्या.















