न्यूज पीसीएमसी नेटवर्क
कासारवाडी (दि. ३० जाने.) :- शेतकऱ्यांना आपला शेतमाल थेट ग्राहकांना विक्री करता यावा, याकरीता कासारवाडीतील शास्रीनगर चौक येथे स्वी. नगरसेवक कुणाल लांडगे यांच्या पुढाकाराने व महाराष्ट्र राज्य कृषि पणन मंडळ व कोरडवाहू उत्थान फार्मर प्रोड्यूसर कंपनी यांच्या सहयोगाने ”शेतकरी आठवडा बाजाराची” संकल्पना राबविण्यात आली होती. या ‘शेतकरी आठवडी बाजाराचा उद्घाटन समारंभ मंगळवार (दि. २२) रोजी आमदार महेश लांडगे यांच्या हस्ते पार पडला.
आमदार लांडगे यांनी या उपक्रमाचे कौतुक केले असून, शेतकरी आठवडे बाजारांना आवश्यक ते पाठबळ दिले पाहिजे. कृषि पणन मंडळाने शेतकरी आठवडे बाजारांकरीता तयार केलेली शेतकरी आठवडा बाजाराची संकल्पनेचा प्रसार व शेतकरी आठवडे बाजाराचे शेतकरी आणि ग्राहकांना फायदे मिळवून देण्यासाठी, अशा उपक्रमांना या निमित्ताने चालना दिली पाहिजे, असे मत व्यक्त केले.
या उपक्रमास परिसरातील नागरिकांचा उस्फुर्त प्रतिसाद मिळाला. यावेळी आमदार महेश लांडगे, स्वी. नगरसेवक कुणाल लांडगे, भाजप पदाधिकारी व कुणालदादा लांडगे स्पोटर्स फ़ाऊंडेशनचे कार्यकर्ते व परिसरातील ग्रामस्थ आदी उपस्थित होते.











