- थेरगावातील गणेशनगरमधील घटना…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २८ जानेवारी २०२२) :- सराईत गुन्हेगाराला तडीपार करण्यात आले होते. काही दिवसांपूर्वीच त्याची तडीपारी संपल्याने तो हद्दीत आला होता. आरोपीने फिर्यादी तरूणाला मोबाईलवर कॉल करून शिवीगाळ केली आणि भेटण्यास बोलविले. त्यानुसार, मंगळवारी (दि. २५) रात्री साडेदहाच्या सुमारास थेरगावातील गणेशनगर येथे तो गेला. त्याने तू मला फोनवर शिवीगाळ का केली, अशी विचारणा केली.
याचा राग आल्याने तू मला मला भाई का नाही म्हणाला, मी या एरियाचा भाई आहे, असे म्हणत आरोपीने तरूणाला शिवीगाळ केली. तसेच कमरेच्या बेल्टने मारहाण करत जमीनीवर टाकलेली बिस्किटे खाण्यास भाग पाडले. इतर आरोपींनीही तरूणाला शिवीगाळ करत बेल्टने व लाथाबुक्क्यानी बेदम मारहाण केली. यामध्ये तो जखमी झाला.
या घटनेचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. २० वर्षीय तरूणाने वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. रोहन वाघमारे या सराईतासह प्रशांत आठवडे (रा. शिवकॉलनी, गणेशनगर, थेरगाव), आदित्य काटे (रा. ताथवडे), प्रेम शिंदे (रा. लोकमान्य कॉलनी, गणेशनगर, थेरगाव) यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे.
















