- नियम आणि अटी लागू; पालिका आयुक्तांचा आदेश…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २९ जानेवारी २०२२) :- पिंपरी चिंचवड शहरातील रुग्णसंख्येत घट होत आहे. त्यामुळे येत्या १ फेब्रुवारीपासून शहरातील शाळा-महाविद्यालये सुरू होणार असल्याचं पालिकेचे आयुक्त राजेश पाटील यांनी जाहीर केलं.
पहिली ते आठवीपर्यंतचे वर्ग फक्त चार तास भरतील. ९ वीपासून पूर्णवेळ शाळा सुरू होतील. मुलांना शाळेत पाठवण्याचा निर्णय पालकांचा असेल. मास्क बंधनकारक आहे. शाळेतील शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे कोविड लसीकरण आवश्यक आहे, असं त्यांनी आदेशात स्पष्ट केलं आहे.















