न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ५ फेब्रुवारी २०२२) :- सोशल मिडियावर थेरगाव क्वीन नावनं अकाऊंट तयार करत शिव्या आणि धमक्या देत व्हिडिओ तयार करणाऱ्या तरुणीला आणि तिच्या मित्रांना पोलिसांनी अटक करून चांगलाच धडा शिकविला होता.
पोलिसांनी या तरुणीला समज देऊन सोडलं असून, या तरुणीसह असणाऱ्या एका कुणाल कांबळे नावाच्या युवकाने पोलिसांसमोर माफी मागितली. त्यानंतर त्यांना सोडून देण्यात आलं .
मात्र, सध्या सोशल मिडियावर एक व्हिडिओ व्हायरल होत असून, तुरुंगाबाहेर आल्यानंतरचा हा व्हिडिओ असल्याचं बोललं जातं आहे. त्यात मोठ्या संख्येने जमाव जमवून स्वागत केल्याचे चित्रण चित्रित आहे. मात्र हा व्हिडिओ नेमका कधीचा आहे, याबद्दल स्पष्ट माहिती मिळू शकलेली नाही.