न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०७ जानेवारी २०२२) :- वय १५ वर्षावरील वयोगटासाठी ‘कोव्हॅक्सिन’ चा पहिला व दुसरा डोस हा पहिल्या डोस नंतर २८ दिवस झालेल्या लाभार्थ्याना लसीकरण केंद्रावर अ, ब, क, ड, इ, फ, ग, ह या प्रभागवार पद्धतीने मंगळवारी (दि. ८) रोजी २२ लसीकरण केंद्रांवर २२०० प्रमाणे देण्यात येणार आहेत. कोविन अॅपवर नोंदणी करण्यासाठी स्लॉट बुकींग ओपन करण्यात येत आहेत. लसीचा कोटा कोविन अॅपव्दारे ऑनलाईन स्लॉट बुकिंग पध्दतीने ३० टक्के लाभार्थी, ऑन द स्पॉट रजिस्ट्रेशन इन कोविन अॅप पध्दतीने ७० टक्के लाभार्थी असा असणार आहे.
वय १८ वर्ष व त्यावरील वयोगटासाठी ‘कोव्हिशिल्ड’ चा पहिला व दुसरा डोस हा पहिल्या डोसनंतर १२ ते १६ आठवडयांच्या दरम्यान म्हणजे ८४ दिवसानंतर ते ११२ दिवसपर्यतचे लाभार्थी, तसेच हेल्थ केअर वर्कर, फ्रंन्ट लाईन वर्कर व ६० वर्षे वा त्यावरील सहव्याधी असलेले लाभार्थींना प्रिकॉशन डोस दुस-या डोसनंतर ९ महिने किंवा ३९ आठवडे पूर्ण झालेल्या लाभार्थींना हा डोस अ, ब, क, ड, इ, फ, ग, ह या प्रभागवार पद्धतीने मंगळवारी (दि. ८) रोजी ४३ लसीकरण केंद्रांवर २१५०० प्रमाणे देण्यात येणार आहेत.
लसीचा कोटा कोविन अॅपव्दारे ऑनलाईन स्लॉट बुकिंग पध्दतीने २० टक्के लाभार्थी, ऑन द स्पॉट रजिस्ट्रेशन इन कोविन अॅप पध्दतीने ८० टक्के लाभार्थी या पद्धतीने असणार आहे. (पिं.चि.मनपावार्डनिहायकेंद्रीय KIOSK टोकनप्रणाली नोंदणी लाभार्थींना प्राधान्य राहील.)
ज्या नागरिकांचा ‘कोव्हिशिल्ड’ व ‘कोव्हॅक्सिन’ लसीचा दुसरा डोस निश्चित केलेले दिवस पूर्ण झालेनंतर ही बाकी आहे त्यांनी पिं.चि.मनपा वार्डनिहाय केंद्रीय KIOSK टोकनप्रणाली किंवा कोविन अॅपव्दारे ऑनलाईन स्लॉट बुकिंग करण्याची आवश्यकता नसून त्यांना पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या सर्व लसीकरण केंद्रावर ऑन द स्पॉट रजिस्ट्रेशन इन कोविन अॅप पध्दतीने लसीकरण करण्यात येईल.
सर्व लाभार्थ्यांचे लसीकरण सकाळी १०.०० ते सायं. ५.०० या कालावधीत करण्यात येईल. पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या सर्व लसीकरण केंद्रावर जेष्ठ नागरिक, दिव्यांग व तृतीयपंथी पिं. चि. मनपा वार्डनिहाय केंद्रीय KIOSK टोकनप्रणाली नोंदणी केलेल्या लाभार्थ्यांना लसीकरणासाठी प्राधान्य देण्यात येईल. कोविन अॅपवर नोंदणी करण्यासाठी मंगळवारी (दि. ८) रोजी सकाळी ८.०० वाजता स्लॉट बुकींग ओपन करण्यात येतील. तसेच स्तनदा व गरोदर महिलांचे कोविड-१९ लसीकरण करणेकामी आठ लसीकरण केंद्रावर काही डोस राखीव ठेवण्यात येत असून ऑन द स्पॉट रजिस्ट्रेशन इन कोविन ऍप या पध्दतीने लसीकरण करण्यात येईल.


















