- गुन्हे शाखा युनिट एकच्या पथकाची कारवाई…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०७ जानेवारी २०२२) :- जिल्ह्यातून दोन वर्षांसाठी आरोपीला २७ जानेवारी २०२१ ला तडीपार केले असतानाही तो विनापरवानगी शहरात आला. त्याच्याकडे कोयता असल्याची माहिती पोलिसांना मिळाली.
त्यानुसार शनिवारी (दि. ७) सायंकाळी पावणे सातच्या सुमारास त्याला भोसरीतील चौकाकडं जाणाऱ्या रस्त्यावरून गुन्हे शाखा युनिट एकच्या पथकाने अटक केली.
त्याच्याकडे कोयता सापडला. अजय अश्रुबा दुनधन (वय २५, रा. बालाजीनगर झोपडपट्टी, भोसरी) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. एमआयडीसी भोसरी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिस अधिक तपास करीत आहेत.


















