- सहा जणांच्या टोळक्यावर गुन्हा दाखल…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०९ फेब्रुवारी २०२२) :- सोसायटीच्या पार्किंगमध्ये फिर्यादी व त्यांचे मित्र रविवारी (दि. ६) सायंकाळी पाचच्या सुमारास गप्पा मारत असताना आरोपी तेथे आला. जुन्य भांडणाच्या कारणावरून व दारूसाठी पैसे न दिल्याने हातातील हत्यार फिर्यादीच्या डोक्यात मारण्याचा प्रयत्न केला. मात्र, फिर्यादीने तो वार चुकविला.
फिर्यादी घरात गेल्याने आरोपीने येणाऱ्या लोकांना हत्यार दाखवून शिवीगाळ केली. ” मी इथला भाई आहे ” असे म्हणत शिवीगाळ करून तीन वाहनांची तोडफोड करीत नुकसान केले. त्यानंतर सर्वांना शिवीगाळ व दमदाटी केली.
हर्षल मारुती दाखले (रा. तापकीरनगर, काळेवाडी) यांनी फिर्याद दिली आहे. त्यानुसार कौस्तुभ देशमुख, अभय गवळी, निखिल अवचार, अनिकेत शिंदे, तात्या शिंदे, सचिन फकाटे या सहा जणांच्या टोळक्यावर गुन्हा दाखल झाला आहे. वाकड पोलिस अधिक तपास करीत आहे.











