न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १० फेब्रुवारी २०२२) :- पिंपरी चिंचवड महापालिका आयुक्त राजेश पाटील यांनी शहरातील मोठ्या सोसायट्यांना कम्पोस्टिंग प्लांट सुरू करण्याचे आदेश दिले आहेत. शहरातील केवळ १४६ सोसायट्यांनी कंपोस्टिंग प्लांट उभारला आहे. तर ४८० सोसायट्यांनी या प्रकल्पाकडे पाठ फिरविल्याचे दिसून येत आहे.
महापालिका आयुक्त राजेश पाटील यांनी मागील दीड महिन्यांपूर्वी मोठ्या प्रमाणावर कचरा उत्पन्न करणाऱ्या हौसिंग सोसायट्यांनी ओला, सुका आणि घरगुती घातक कचरा विलगीकरण करावा. तसेच ओल्या कचऱ्यावर स्वतःच्या परिसरामध्ये कंपोस्टिंग करणे बंधनकारक केले आहे. परंतु शहरातील ६२६ सोसायट्यांपैकी १४६ सोसायट्यांनी सध्या कंपोस्ट प्लांट कार्यान्वित केला आहे. ४८० सोसायट्यांकडे कम्पोस्टिंग प्लांट नाही. त्यानुसार केवळ शहरात २३ टक्के सोसायट्यांकडेच कंपोस्ट प्लांट आहे.
महापालिका आयुक्तांनी डिसेंबर अखेर मोठ्या प्रमाणावर कचरा निर्माण करणाऱ्या सोसायट्यांना कम्पोस्टिंग प्लांट उभारण्याचे आदेश काढले आहेत. परंतु ज्या सोसायट्या कचरा विलगीकरण करून कम्पोस्टिंग करत नाहीत अशा एकाही सोसायटीवर अद्याप कार्यवाही करण्यात आलेली नाही. लवकरच माहिती घेऊन कार्यवाही करण्यात येणार आहे.
– संदीप खोत, उपायुक्त पिंपरी चिंचवड पालिका…












