- व्यापाऱ्यांकडून खंडणी घेतल्याचे प्रकरण…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १२ फेब्रुवारी २०२२) :- पिंपरी चिंचवड महापालिकेकडून गाळे मिळवून देतो, असे सांगून भाजप प्रदेश कामगार आघाडीमध्ये दरवर्षी रुपये बाराशे भरायला भाग पाडले. व्यापाऱ्यांची फसवणूक केल्याप्रकरणी भाजपचे माजी उपमहापौर व विद्यमान नगरसेवक केशव घोळवे यांना अटक केली होती. पिंपरी न्यायालयाने त्यांचा जामीन शुक्रवारी मंजूर केला.
व्यापाऱ्यांकडून खंडणी घेतल्याप्रकरणी पोलीस ठाण्यात केशव घोळवे यांच्यावर गुन्हा दाखल होता. या प्रकरणांमध्ये केशव घोळवे यांच्यातर्फे अॅड. एन. डी. पाटील, अॅड. पुष्कर पाटील, अॅड. अजिंक्य मिरगळ यांनी तसेच इतर चार आरोपींच्या वतीने अॅड. गोरक्ष आव्हाड, अॅड. शुभांगी जेटीथोर, अॅड. साजन महबुबानी यांनी युक्तिवाद केला. आरोपीच्या वकिलांचा युक्तिवाद मान्य करत पिंपरी न्यायालयाने त्यांचा जामीन मंजूर केला.
















