न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १७ फेब्रुवारी २०२२) :- घरातील टीव्ही कॅबिनेट हे नऊ हजार ५०० रुपये किमतीला विकण्याबाबत ओएलएक्स साईटवर ऑनलाईन फोटो अपलोड केले होते. त्यानुसार अनोळखी व्यक्तीने फिर्यादीशी ऑनलाइन माध्यमातून संपर्क साधून फिर्यादीचा विश्वास संपादन केला. तसेच फिर्यादीला क्यूआर कोड शेअर केला.
त्यानंतर फिर्यादीच्या एचडीएफसी बँक खात्यातून ९२ हजार ३३१ रुपये आणि आयसीआयसीआय बँकेच्या खात्यातून तीन लाख ५२५ रुपये, असे एकूण तीन लाख ९२ हजार ८५६ रुपये ट्रान्सफर करून फिर्यादीची फसवणूक केली.
रहाटणी पिंपळे सौदागर येथे सोमवारी (दि. १४) रोजी ही घटना घडली. विनयकुमार ताराचंद सूद (वय ६५, रा. रहाटणी, पिंपळे सौदागर) यांनी या प्रकरणी वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.