न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २५ फेब्रुवारी २०२२) :- पिंपरी चिंचवड महापालिकेच्या शिक्षण विभागामध्ये प्रशासन अधिकारी म्हणून अतिरिक्त कार्यभार असलेल्या स्मिता गौड यांची बदली झाली आहे. तर शिक्षणाधिकारी म्हणून संजय नायकडे यांची पदोन्नतीने नियुक्ती झाली आहे.
त्यांच्या नियुक्तीचे आदेश महाराष्ट्र राज्याचे उपसचिव टि. वा. करपते यांनी दिले आहेत. दरम्यान, पिंपरी चिंचवड महापालिकेच्या शिक्षण विभागामध्ये प्रशासन अधिकारी म्हणून ज्योत्स्ना शिंदे कार्यरत होत्या.
त्यांची पाच महिन्यापूर्वी बदली झाली. त्यांच्या जागेवर स्मिता गौड यांना अतिरिक्त कार्यभार देण्यात आला. तर आता पूर्णवेळ शिक्षणाधिकारी म्हणून संजय नायकडे यांची नियुक्ती करण्यात आली आहे.











