- मुंबईतील राजभवनात ‘कर्तव्यम प्रेरणा’ पुरस्काराने मान्यवर सन्मानित…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २५ फेब्रुवारी २०२२) :- महाराष्ट्र राज्यासह संपूर्ण भारत देश हे कार्यक्षेत्र असणाऱ्या व लोकसेवेसाठी सदैव तत्पर राहून कार्य करणाऱ्या कर्तव्यम सोशल फाउंडेशनचे कार्य हे केवळ प्रेरणादायीच नव्हे तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतील नवभारत निर्माणाच्या दृष्टीने अत्यंत आशादायी आहे व सामाजिक परिवर्तनाची क्रांतिकारक वाटचाल आहे, असे प्रतिपादन महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी नुकतेच मुंबई येथील राजभवन या ठिकाणी पार पडलेल्या कर्तव्यम प्रेरणा संमेलन २०२२ च्या निमित्ताने केले.
संमेलनाचे उद्घाटन राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी कर्तव्यम सोशल फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष संतोष बारणे स्वागताध्यक्ष तर सचिव क्रांती कुमार महाजन संमेलनाध्यक्ष म्हणून उपस्थित होते. भारतीय स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी वर्षामध्ये असणाऱ्या नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या शतकोत्तर रौप्य वर्षाच्या अनुषंगाने याप्रसंगी राज्यपाल यांच्या हस्ते लेखक क्रांती कुमार महाजन यांनी लिहिलेल्या सुभाष सिक्रेट या पुस्तकाच्या एकविसाव्या आवृत्तीचे प्रकाशन देखील करण्यात आले. यावेळी संपूर्ण महाराष्ट्रातील विविध क्षेत्रांमध्ये उल्लेखनीय कार्य केलेल्या ३६ प्रतिभावंतांना राज्यपालांच्या हस्ते कर्तव्यम प्रेरणा पुरस्कार बहाल करून सन्मान करण्यात आला.
उदघाटनप्रसंगी संस्थेचे संस्थापक अध्यक्ष संतोष बारणे यांनी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांचा राधाकृष्णप्रतिमा व मानपत्र बहाल करून स्वागत केले. डॉ. उज्वलकुमार चव्हाण, डॉ. नेमजी गंगर, डॉ. शेख अख्तर हसन अली, डॉ. अलका नाईक, सूर्यकांत गोवळे, अशोक शिंदे, डॉ. सुनील चव्हाण, सागर कवडे, यशवंत कुर्वे, भास्कर अमृतसागर, मोहम्मद रियाझ शेख, रामू पागी, सुनील सिंग, दामोदर वसंतराव धाडवे, प्रतिभा घाणेकर, भिडे, डॉ. यतीन वाघ, डॉ. वर्षा देशमुख, भाऊसाहेब कोकाटे, किशोर पाटील, डॉ. रमेश गोटखडे, यशपाल वरठे, डॉ. सुकन्या भट, डॉ. निलय जैन, बंडू मोरे, रामदास कोकरे, सोमनाथ वैद्य, प्रमोद धुर्वे, सुरेश कोते, डॉ. अनिल रोडे, रोशन मराठे, अविनाश आदकी, जगन्नाथ शिंदे, अमित गोरखे, ज्योत्स्ना शिंदे-पवार, आशिष श्रीवास, आरती सचदेव या महाराष्ट्रातील विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केलेल्या प्रतिभावंतांना सन्मानित करण्यात आले.
सूत्रसंचालन भाऊसाहेब कोकाटे यांनी केले तर रोशन मराठे यांनी आभार व्यक्त केले. महाराष्ट्राच्या सांस्कृतिक इतिहासात मोलाची भर घालणाऱ्या कर्तव्यम प्रेरणा महासंमेलनाच्या यशस्वी आयोजनाबद्दल संस्थेचे अध्यक्ष संतोष बारणे यांचे सर्वत्र अभिनंदन केले जात आहे.











