- धनादेशाद्वारे बँकेतून रक्कम काढून पैशांचा अपहार…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २६ फेब्रुवारी २०२२) :- चिखलीतील शिवतेजनगर येथील गुंजकर मल्टीस्पेशालिटी रुग्णालयात आरोपी महिला एप्रिल २०२१ ते जून २०२१ या कालावधीत नोकरी करीत होती. तिला नोकरीवरून काढल्यानंतर देखील ती वेळोवेळी रुग्णालयात येत होती.
दरम्यान, आरोपीने रुग्णालयाशी संलग्न असलेल्या आरोही मेडिकल अँड जनरल स्टोअर्समधील धनादेश पुस्तक चोरले. त्यातील चार धनादेशावर फिर्यादी यांचा मुलगा डॉक्टर जयकर यांची बनावट सही करून ५८ हजार पाचशे रुपयांचा अपहार केला.
यामध्ये फिर्यादीची फसवणूक झाली. याप्रकरणी दिगंबर मारोतराव गुंजकर (रा. सेक्टर क्रमांक ११, स्पाईन रोड चिखली) यांनी चिखली पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार महिलेविरोधात गुन्हा दाखल झाला असून पोलिस अधिक तपास करीत आहेत.